HW Marathi
मुंबई

पाचव्या दिवशीही मध्य रेल्वेचा खोळंबा

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज (१४ जून) सलग पाचव्या दिवशी विस्कळीत झाली आहे. मुलुंड स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मध्य रेल्वेचा विलंब झाला आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ऑफिसमधून घरी सलग पाचव्या दिवशी त्रासाला सामोर जावे लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही दिशेकडील जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल  नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार येथे थांबा दिला जात नाही. तर या लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. गुरुवारी (१३ जून) सकाळी देखील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी झाली होती.

यापूर्वी बुधवारी (१२ जून) कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती. तसेच मंगळवारी (११ जून) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल १५ ते २० मिनिटे थांबल्या होत्या. त्यामुळे वाहतूक उशिराने सुरू होती. तर सोमवारी (१० जून) पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

 

Related posts

किंग्ज सर्कलजवळील पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश

News Desk

शिर्केने उभारली अनधिकृत इमारत म्हाडाने अदा केले 19 कोटी

News Desk

“राज ठाकरे चौकशीसाठी निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला ?”

News Desk