HW News Marathi
मुंबई

मुंबईत एनटीपीसीच्यावतीने नो टोबॅको मोहिमेला सुरूवात

मुंबई – जागतिक नो टोबॅको दिनाच्या (31 मे) निमित्तानं एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) लिमिटेडच्यावतीने जनजागृती मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये ‘गुटखा-तंबाखु’ या पथनाट्याचा समावेश आहे. या पथनाट्यामध्ये प्रसिद्ध डॉक्टर्सही सहभागी झाले आहेत.

नो टोबॅको मोहिमेअंतर्गत एनटीपीसी लिमिटेडच्यावतीने प्रतिकात्मक सिगारेट तयार करण्यात आली असून त्यावर धुम्रपानाचे परिणाम दाखवण्यात आले आहेत. त्याठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी तो सेल्फी पॉईंट ठरतोय. याशिवाय रांगोळीच्या माध्यमातूनही नो टोबॅकोचा संदेश देण्यात आला आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम ठेवण्यासाठी एनटीपीच्यीवतीने कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण तयार केलं आहे. या मोहिमेचं उद्घाटन एनटीपीसीचे विभागीय कार्यकारी संचालक सुभाशिष घोष यांच्याहस्ते करण्यात आलं आहे. डॉ. शर्मिला पिंपळे आणि डॉ. जैनी लोढा यांनी तंबाखुच्या दुष्परिणामांची माहिती एका चर्चासत्राद्वारे कर्मचाऱ्यांना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आजपासून तीन दिवस बॅंका बंद असणार

swarit

डॉ.अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

News Desk

हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे जल्लोषात स्वागत

News Desk
महाराष्ट्र

अवैधरित्या सागवान तस्करी करणारा टेंम्पो भोकर वनविभागाने पकडला

News Desk

उत्तम बाबळे

नांदेड- अवैधरित्या सागवान लाकडाची तस्करी करणारा टेंम्पो सागवान लाकडांसह भोकर वनविभागाने भोकर तालुक्यातील माै.बटाळा रस्त्यावर १ जून रोजी पकडला असून १ लाख ३० हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्तीसह वन कायद्यानूसार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई लाकूड तस्करांचे धाबे दणानले आहे. भोकर वन परिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सागवान लाकूड तोड व तस्करीचे प्रकार वाढले असल्याने नव्यानेच भोकर वन परिक्षेत्र कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून रुजू झालेले आशिष हिवरे (म.व.से.) यांनी या वनपरिक्षेत्राचा बहुतांश भाग तेलंगणा राज्य सिमेलगत येत असल्याने परप्रांतात होणारी तस्करी रोखण्यासाठी एक विशेष गस्ती पथक नेमले आहे.

या पथकास गुप्त माहिती मिळाल्यावरुन त्यांनी आशिष ठाकरे (भा.व.से.),व्ही.एन.गायकवाड संवसे ,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंगद खटाने,के.एस.खरात,बजरंग देवकते,कु.एम.जे.पठाण व अन्य वन कर्मचा-यांचा सहभाग असलेल्या त्या पथकाद्वारे साफळा रचून भोकर पासून काही अंतरावरील माै.बटाळा रस्त्यावर ४९ नग ज्याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असलेला माैल्यवान सागवान लाकूड घेऊन टेंम्पो क्र. एम.एच.२६ ६३९६ हा चालक शेख अफसर शेख अहमद रा.भोकर यासह पकडला.सदरील सापळ्यात अंदाजे ३० हजार रुपयाचे सागवान लाकूड व १ लाख रुपये किमतीचा टेंम्पो असा एकूण १ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालका विरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१), मुंबई वननियम १९४२ चे कलम ६६ अनुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास वनपाल अंगद खटाने हे करत असून झालेल्या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणानले आहे.

Related posts

..तर मी माझ्या बापाची अवलाद नाही ! दानवेंना इशारा देताना हर्षवर्धन जाधव आक्रमक

News Desk

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श! – उपमुख्यमंत्री

Aprna

पोषक वातावरणामुळे राज्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ! – उपमुख्यमंत्री

Aprna