HW Marathi
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी रिपाइंची जाहीर सभा

मुंबई | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी पार्क दादर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंतर्फे करण्यात आले आहे.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए) च्या वतीने मागील २८ वर्ष आणि त्याआधी भारतीय दलित पँथरपासून अंदाजे सुमारे ४१ वर्षांपासून दरवर्षी शिवाजी पार्क येथे दि ६ डिसेंबरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही शिवाजी पार्क येथे  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रामदास आठवलेंच्या अध्यक्षतेत जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रिपाइंचे देशभरातील सर्व राज्यप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

Related posts

लोकशाही संवर्धनाची जबाबदारी आता पत्रकारांवर  – विवेक पंडित

News Desk

उद्धव ठाकरे यांचे गलिच्छ राजकारण :नितेश राणे

Ramdas Pandewad

विरोधक एकत्र आले तरही भाजपचा विजय निश्चित | अमित शहा