मुंबई | गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीमधील जंगलाला सोमवारी (३ डिसेंबर) साडेसहाच्या सुमारास संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या जंगलातील झाडे आणि कोरड्या गवताने पेट घेतल्याने सुमारे ३ ते ४ किलोमीटरच्या परिसरात ही आग पसरत गेली. मात्र तब्बल ६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या ही आग नियंत्रणात आणण्यास यश आले आहे.
Mumbai: Fire that broke out in forest area opposite Gokuldham near Goregaon has been doused. #Maharashtra. (File pic) pic.twitter.com/2oXL2s8VQ2
— ANI (@ANI) December 4, 2018
Mumbai: Firefighting operations continue in forest area opposite Gokuldham near Goregaon. #Maharashtra pic.twitter.com/ZDj8GZvAvd
— ANI (@ANI) December 3, 2018
सोमवारी संध्याकाळी आरे कॉलनीमधील जंगलाला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आग विझवण्याचे काम सुरू असतानाच आरे कॉलनीतल्या डोंगरावरील जंगलाला आग लागल्याचे फोटोज तेथील नागरिकांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते. आरे कॉलनीच्या डोंगरावरील जंगलाला आग लागलेली असतानाच ही आग शहराकडे पसरेल या भीतीने स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र खरंतर तेथे अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन प्रशासनाकडून केले जाते होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.