HW News Marathi
मुंबई

अभिनेता सुशांतसिंह सोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने केली आत्महत्या

मुंबई | अभिनेता आणि अभिनेत्रींच्या आत्महत्येची प्रकरणे वाढत चालली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पूर्ण बॉलिवूड हादरले होते. आता त्याच्या सोबत काम केलेल्या आणखी एका अभिनेत्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात सुशांत सिंग राजपूतसोबत झळकलेला अभिनेता संदीप नाहर याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ चित्रपटात, तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्येही संदीपने विविध भूमिका साकारल्या होत्या.मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात संदीपचा मृतदेह आढळला आहे. आत्महत्येपूर्वी संदीपने फेसबुकवर एक व्हिडिओ आणि सुसाइड नोट शेअर केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

काय लिहिलं आहे सुसाइड नोटमध्ये –

“आता जगण्याची इच्छा होत नाहीये. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणं भीत्रेपणाचं लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचं होतं. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतलं नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटतं… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही…मुंबईत अनेक वर्षांपासून आहे…

खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो. आत्महत्या मी खूप आधीच केली असती, पण मी स्वतःला वेळ दिला…सर्व ठिक होईल असं वाटलं…पण रोजच भांडणं होतात…या चक्रव्युहात अडकलोय..बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा रस्ता नाही…आता मला हे पाऊल आनंदाने उचलावं लागेल…इथल्या जीवनात नरक बघितला…इथून निघून गेल्यानंतर काय होईल माहिती नाही पण जे काही होईल मी त्याचा सामना करेल”. शेवटी संदीपने एक विनंती करताना, “एक रिक्वेस्ट है…मेरे जाने के बाद कांचन को कुछ मत बोलना पर उसके दिमाग का इलाज जरुर करवा लेना”, असं त्याने सुसाइड नोटमध्ये नमूद केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आझाद मैदान येथे सफाई कामगारांचे १५ ऑगस्ट रोजी आंदोलन

News Desk

‘मरे’ची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांनी रुळांवर उतरून केला प्रवास

News Desk

शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

News Desk