HW News Marathi
मुंबई राजकारण

ममता बॅनर्जींची ‘ही’ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. गेल्या वर्षी ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान राष्ट्रगीताचा (National Anthem) अपमान केला होता. यानंतर भाजपचे भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ममता बॅनर्जींविरोधातील ही तक्रार रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (29 मार्च) फेटाळून लावली आहे.

या प्रकरणी न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पुढे सुनावणी झाली. ममता बॅनर्जींच्या वतीने वकील माजिद मेमन यांनी बाजू मांडली. ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसून हे संपूर्ण प्रकरण फक्त त्यांची अवहेलना करण्याच्या राजकीय हेतून केल्याचा आरोप त्यांनी न्यायालयात केला. परंतु, या प्रकरणी सत्र न्यायालयाने नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले असून त्यांच्या विरोधामधील प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामुळे सत्र न्यायालयाच्या निर्णय येण्यापूर्वी कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे मुंबई दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना ममता बॅनर्जी या मध्येच थांबल्या. यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप जपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केला. यानंतर विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई पोलिसांत ममता बॅनर्जींच्या विरोधात तक्रार दाखले हीतो. या प्रकरणी ममता बॅनर्जी यांना शिवडी न्यायालयाने समन्स देखील बजाविला होता. यानंतर ममता बॅनर्जींना 2 मार्ज 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.

 

 

 

 

Related posts

उपेंद्र कुशवाह यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

News Desk

जाणून घ्या…कसे आहे व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

News Desk

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk