HW News Marathi
मुंबई

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल नवीन खुलासा झाला आहे. बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्या बाथटबमध्ये पडल्या.

गल्फ न्यूजने श्रीदेवी यांच्या शरीरात दारुचे अंश सापडल्याचे वृत्त दिले आहे. बाथटबमध्ये बुडून अपघाती मृत्यू झाल्याचे न्यायवैद्यक अहवालात म्हटले आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. गल्फ न्यूजकडे श्रीदेवी यांचे डेथ सर्टीफिकेट असून त्याआधारे हे वृत्त दिले आहे.श्रीदेवी यांनी मद्यपान केल्यामुळे बाथटबमध्ये बुडून तिचा अपघाती मृत्यू झाला, असा दुबई पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे. गल्फ न्यूजने हे वृत्त दिले आहे.

हा अपघात नेमका कशामुळे घडला त्याबद्दल तपास सुरु आहे. न्यायवैद्यक अहवालात फक्त बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. श्रीदेवी यांच्याबरोबर नेमके त्यावेळी कोण होते याबद्दल दुबई पोलीस तपास करत आहेत. न्यायवैद्यक अहवाल श्रीदेवीचे कुटुंबिय आणि भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आला आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक प्रकारचे दावे समोर येत आहेत. पती बोनी कपूर यांना श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली आढळल्या, असं वृत्त आधी समोर आलं.

पण आता हॉटेल स्टाफकडून गंभीर दावा केला जातो आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी श्रीदेवी यांना बाथरूममध्ये पडलेलं पाहिलं व त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्याचं वृत्त ‘पिंकविला’ने दिलं आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा रूमची बेल वाजवून श्रीदेवी यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडल्यावर त्यांना श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या दिसल्या. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास श्रीदेवी यांनी रूम सर्व्हिसला फोन करून पाणी मागितलं. हॉटेल स्टाफ 15 मिनिटांनी पाणी घेऊन श्रीदेवी यांच्या रूममध्ये पोहचला.

अनेकदा रूमची बेल वाजवूनही श्रीदेवी यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आत काहीतरी झालं असावं, असा विचार करून हॉटेल स्टाफने दरवाजा तोडला. तेव्हा श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या स्टाफला दिसल्या. रात्री 11 वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी श्रीदेवी यांना पाहिलं तेव्हा त्यांच्या ह्रदयाचे ठोके सुरू होते. श्रीदेवी त्यावेळी हॉटेलमध्ये एकट्याच होत्या, असा दावा केला जातो आहे. हॉटेलमधील सुत्रांनी दुबईतील एका प्रसिद्ध वृत्तपत्राला ही माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण,कुर्ला व ठाणे मुंबईतील तीन अस्वच्छ रेल्वे स्थानक

News Desk

रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर ,केंद्र सरकारकडून दिवाळीचा बोनस जाहीर

Gauri Tilekar

मुंबई विद्यापीठाला ठोकले टाळे

News Desk