HW News Marathi
देश / विदेश

श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूर यांची दुबई पोलिसांकडून चौकशी

दुबई | अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचे पती बोनी कपूर यांची दुबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. बोनी कपूर यांची साडे तीन तास चौकशी करण्यात आली आहे. श्रीदेवींचे कॉल डिटेल्सही तपासले जात आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार श्रीदेवीचा मृत्‍यू हा हार्टअटॅकने नाही तर बाथटबमध्ये पडून झाल्याचे म्‍हटले आहे. तीच्‍या रक्‍तमध्‍ये मद्याचे अंश आढळल्‍याचेही रिपोर्टमध्‍ये म्‍हटले आहे. बोनी कपूर यांचा जबाब कॅमे-यामध्‍ये रेकॉर्ड केला गेला आहे.

यासोबत दुबईतील लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या कपूर कुटुंबीयांचीही चौकशी होणार असल्याचे समजते आहे. दरम्यान, श्रीदेवीचे पार्थिव ताब्यात मिळवण्यासाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे भारतीय परराष्ट्रमंत्रालयाच्या दुबईतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget2022 Live Updates: अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प! – जयंत पाटील

Aprna

महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीचे पडसाद उमटू लागल्यानंतर फडणवीसांचे गोयल यांना पत्र

News Desk

#SushantSinghRajput | मुंबई पोलिसांच्या तपासावर संजय राऊतांनी व्यक्त केली नाराजी

News Desk