HW News Marathi
मुंबई

अर्शद वारसीच्या त्या तक्रारीची अदानी इलेक्ट्रिकसिटीने घेतली दखल

मुंबई | सध्या कोरोना महामारीन नागरिक त्रस्त आहेतच आणि त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने अधिक अडचणींमध्ये भर पडली आहे. अशातच बॉलिवुड अभिनेता अर्शद वारसी याला मोठ्या आकड्यांचे वीज बील आकारण्यात आले आहे. त्याच्या खात्यातून १,०३,५६४ इतके रुपये कापण्यात आले. त्यासाठी त्याने ट्विट केले होते. त्याच्या या तक्रारीची अदानी इलेक्ट्रिसिटीकडून दखल घेण्यात आली आहे. लगेचच त्याने दुसरे ट्विट केले आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटीकडून समस्या सोडवण्यात आली असल्याचं त्यानं म्हटलं आहे. ‘अंधार असलेल्या बोगद्याच्या शेवटी एक प्रकाश आहे. अदानी अदानी इलेक्ट्रिसिटी तात्काळ प्रतिसाद मिळाला, समस्या सुटली. आपल्याला फक्त त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे , धन्यवाद, असे अर्शद याने म्हटले आहे.

आधी काय केले होते ट्विट?

ट्विट करत अर्शद वारसी याने याबाबत माहिती दिली आहे. त्याने केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, हे माझे अदानी यांच्याकडून आकारण्यात आलेले वीज बिल आहे. माझ्या खात्यातून १.०३,५६४ रुपये कापण्यात आले आहेत, अशा आशयाचे त्याने ट्विट केले आहे. यावरून नक्कीच असे निदर्शनास येते की अदानी वीज बिल कंपनीकडून ग्राहकांना आकारण्यात येणारे वीज बील अतिशय जास्त असून आकडेवारी ही आकलनाच्या पलिकडे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही ऐतिहासिक वाढ

News Desk

धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग

News Desk

बनावट किन्नर विरोधात कारवाई करा- किन्नर माय ट्रस्टची मागणी

News Desk