HW News Marathi
मुंबई

यंदा कितीही थर लावा; न्यायालयाने निर्बंध हटविले

मुंबई – न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांमुळे गतवर्षी आयोजक आणि गोविंदा पथकांची मोठी पंचाईत झाली होती. अनेक आयोजकांनी तर हंडी बांधलीच नव्हती. हे निर्बंध मागे घेण्यासाठी पुन्हा न्यायालयात धाव घेण्यात आलेली. गोपाळकाला तोंडावर आला असताना न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज न्यायालयाने थरांच्या उंचीच्या मर्यादेवरील सर्व निर्बंध शिथिल केले. त्यामुळे गोविंदांनी एकच जल्लोष केला.

सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील दहीहंडी पथकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या फेरसुनावणीदरम्यान न्यायालयाने थरांची उंची आणि गोविंदांचे वय दोन्ही निर्बंध शिथिल केले. त्यानुसार आता दहीहंडीच्या मनोऱ्यांची उंची किती असेल, याचा निर्णय विधिमंडळावर सोपवण्यात आला आहे. तसेच दहीहंडीत १८ वर्षांखालील मुलांना घेऊ नये, हे गतवर्षीचे आदेश मागे घेत, १४ वर्षांखालील मुले सहभागी होणार नाहीत, याची काळजी घेण्यास सरकारला बजावण्यात आले.

तत्पूर्वी राज्य सरकारकडून न्यायालयात दहीहंडीच्यादृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. गोविंदांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, चेस्ट गार्ड देणं तसेच सगळ्यांच्या नावांची नोंद ठेवण्याचे आदेश आयोजकांना देण्यात आले आहेत. याशिवाय, दहीहंडीच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स बंधनकारक असून मद्यपींना कार्यक्रमाच्या जागी मनाई केली आहे. तसेच आयोजकांना ध्वनी प्रदुषणासंदर्भातील सर्व नियम लागू आहे, अशी माहिती यावेळी राज्य सरकारने दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन

Adil

मुंबईतील अनेक हॉटेलमधे ग्राहकांची फसवणूक !

News Desk

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

News Desk