HW News Marathi
मुंबई

आदित्य ठाकरेंवर नेतेपदाची जबाबदारी

मुंबई | युवासेनेची स्थापना करून तरुणाईला साद घालणाऱ्या शिवसेनेत पुन्हा एकदा युवा पर्वाला सुरुवात झाली आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचे नेतेपद कायम ठेवण्यात आले असून एकनाथ शिंदे यांचीही शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरळी येथील एनएसआयसीच्या पटांगणावर पार पडलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना पक्षांतर्गत निवडणूक होत आहेत. निवडणुकीत युवा नेता आदित्य ठाकरे यांची नेते पदासाठी बिनविरोधी निवड होणार आहे. मुंबईतील वरळीमध्ये नॅशनल स्पोर्टस कॉम्पलॅक्समध्ये निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

या निवडणुकीत नेते पदासाठी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचे नाव निश्चित झाले आहे. सेनेतील जेष्ठ नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांची नेते पदावरुन शिवसेनेच्या संघटन मार्गदर्शक पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. युवा नेता आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर नवी जबाबदीर टाकली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अक्षय कुमारची महापालिकेला ३ कोटींची मदत, मास्क, पीपीई किट्सही पुरवणार

News Desk

पुण्यात तिकीटांसाठी अामरण उपोषण

News Desk

मुंबईत आजचा पारा 13.8 अंशावर पोहोचला

Aprna