HW News Marathi
मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज (१६ जानेवारी) अखेर तब्बल ९ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. थोड्याच वेळात वडाळा डेपोमधून याची अधिकृत घोषणा केली जाईल. आज सकाळी ११ वाजता झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने बेस्ट कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची तयारी दाखवली असून या न्यायालयाच्या या निर्णयाबाबत बेस्ट कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संपात सहभागी झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही

संपात सहभागी झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे बेस्ट प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. त्याचप्रमाणे एकाही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात येणार नाही, कोणाचाही पगार कापला जाणार नसल्याचे देखील आश्वासन देण्यात आले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

१५ टप्प्यांमध्ये वेतनवाढ लागू करावी, अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून जानेवारी २०१९ पासून १० टप्प्यात वेतनवाढ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्य मागण्यांसाठी मध्यस्थाची नेमणूक

बेस्ट कर्मचाऱ्यांची १० टप्पयातील वेतनवाढीची प्रमुख मागणी मान्य झाल्यानंतर बेस्टचे महापालिकेत विलनीकरण आणि खाजगीकरणासारख्या मागण्यांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी उच्च न्यायालयाकडून मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत कर्मचारी संघटनांकडून समाधान व्यक्त केले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माटुंग्यातील बिग बाजारमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी

News Desk

इरफान खानला ‘न्युरो इंडोक्राइम ट्युमर’ आजाराने ग्रासले

News Desk

भिवंडीत २६ मुलांना बिर्याणीतून विषबाधा

swarit