HW News Marathi
मुंबई

निवासी भागात फटाके विक्रीधारकांविरुद्ध आझाद मैदानात आंदोलन

मुंबई | विस्फोटक नियम व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोपरी ठाणे पुर्व येथे निवासी इमारतीत तसेच गर्दीच्या ठिकाणी बेकायदेशीर मंजुर करण्यात आलेल्या फटाके साठा व विक्री परवानाधारकांवर त्वरित कारवाई करावी याकरिता आझाद मैदान मुंबई येथे आज एकदिवसीय निदर्शने आंदोलन करण्यात आले.

ठाणे शहराच्या पूर्वेकडील भागात असलेल्या कोपरी विभागात विस्फोटक नियम डावलून बेकायदेशीरपणे फटाका मार्केट उभारलेले असून, सदर मार्केट भर नागरीवस्तीत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवितास ते अतिधोकादायक ठरलेले आहे. या बेकायदेशीर फटाका मार्केटसंबंधी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ठाणे महापालिका, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाकडे स्थानिक रहिवाशी व सामाजिक संघटनांच्या वतीने तक्रारी दाखल करूनही, संबंधित प्रशासनाने अद्यापपर्यंत याची कोणतीही दखल घेतलेली नाही. याच पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांचा निषेध करण्यासाठी, तसेच ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील बेकायदेशीर व अतिधोकादायक ठरलेले हे फटाका मार्केट कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी मिलिंद कुवळेकर यांनी एकदिवसीय निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनाला धर्मराज्य पक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाने पाठींबा दिला आहे. असेही त्यांनी सांगितले.

फटाकाविक्रीच्या दुकानांना दिलेले परवाने न्यायालयीन आदेशानुसार अग्निशमन विभागाने यापूर्वीच रद्द केलेले असतानाही, सद्यस्थितीत आजदेखील फटाकाविक्रीची दुकाने राजरोसपणे सुरूच आहेत. या प्रकाराकडे कोपरीतील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाबरोबरच, ठाणे शहरातील सर्वपक्षीय बलाढ्य राजकीय नेत्यांचा या फटाकाविक्रेत्यांवर वरदहस्त आहे. ज्या मतदारांच्या मतांवर आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलो, त्याच मतदारांच्या जीविताशी खेळण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. संरक्षण देणारे पोलीस, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि सोयी-सुविधा पुरविणारे पालिका प्रशासन जर अशा गंभीर प्रकरणाला खतपाणी घालून त्यांचे संरक्षण करणार असेल, तर सर्वसामान्य करदात्या स्थानिक ठाणेकर नागरिकांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा करावी? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तरी स्थानिक कोपरीवासीयांच्या जीवितास अतिधोकादायक ठरलेले हे फटाका मार्केट त्वरित बंद करून, त्यास आशीर्वाद देणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे तिकीट काढताना महिलेच्या डोक्यावर कोसळला स्लॅब

News Desk

नगरसेवकांवर आता लवकरच सीसीटीव्हीची नजर

News Desk

मुंबई विमानतळावर मेगाब्लॉक, तिकीट दरावर होणार परिणाम

News Desk