मुंबई । एअर इंडियाच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमााची एअर हॉस्टेस विमानातून खाली पडल्याची घटना काल (१४ ऑक्टोम्बर )घडली आहे. हर्षा लोबो (५३) असे या एअर हॉस्टेसचे नाव असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळावर विमान उभे असताना ही घटना घडली. विमानाचा दरवाजा बंद करत असताना एअर हॉस्टेसखाली पडली. सध्या त्यांच्यावर नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. हर्षा लोबो या कर्मचारी ३० फुटांवरून खाली पडल्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
An Air India air hostess fell off a Mumbai-Delhi flight this morning while boarding the aircraft at Mumbai airport. She has been admitted to Mumbai's Nanavati hospital. https://t.co/zYkOZltcqT
— ANI (@ANI) October 15, 2018
एअर इंडियाचे एआय-८६४ हे विमान सकाळी ७ वाजता दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. विमानाच्या उड्डाणाआधी त्यांनी एल-५ दरवाजा उघडला. त्यावेळी त्या खाली पडल्या,’ अशी माहिती सूत्रानं कडून माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांना तातडीनं नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.