मुंबई | भारत चीन दरम्यान सुरू असलेल्या वादात सीमेवर २० जवानांनी प्राणाची आहुती दिली. तर या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केले होते. आता गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. फिल्म क्रिटीक तरण आदर्श यांनी यासंदर्भातील माहिती ट्विरवरून दिली आहे.
“अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले नाही. या चित्रपटात चीनच्या लष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही अजून अंतिम करण्यात आलेली नाही,” असे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे. अजय देवगण एएफ फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत.
IT'S OFFICIAL… #AjayDevgn to make film on #GalwanValley clash… The film – not titled yet – will narrate the story of sacrifice of 20 #Indian army men, who fought the #Chinese army… Cast not finalized… Ajay Devgn FFilms and Select Media Holdings LLP will produce the film. pic.twitter.com/yaM6rPcK7Z
— taran adarsh (@taran_adarsh) July 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.