HW News Marathi
मुंबई

अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सलमान खानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

मुंबई वरळी परिसारत एका विवाहितेचा अर्धनग्न विडीओ वायरल करण्याची धमकी दिल्या प्रकऱणी वरळी पोलिसांनी आरोपी सलमान खान (23) विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. वरळी परिसरात विवाहिता आपल्या परिरासोबत राहते. ती घरी एकटी असताना त्याच परिसरात राहणारा समलमान खान चोरून तिचे अर्धनग्न फोटो काढले होते.जर तुम्ही सलमान खान कलाकार समजत आसेल ते चुकीचे आहे. आरोपी 23 वर्षीय वरळी परिसरात राहणारा तरूण आहे.

ऑगस्ट महिन्यापासून तो विवाहितेला धमकावत होता. शुक्रवारी महिला घरात एकटी असताना तो घरात घुसला. शारीरिक संबंध ठेवण्यासोबतच पैशांची मागणी त्याने मागणी केली. नाहीतर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. महिलेने त्याचा विरोध करताच, त्याने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. सलमानची विकृती वाढत असल्याने, तिने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानुसार, वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी सलमानविरुद्ध विनयभंग, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

LIVE Rain Update : पावसाच्या संततधारेमुळे संपूर्ण मुंबई जलमय, रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

News Desk

कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या मनसे नगरसेवकाला जामीन मंजूर

News Desk

शिवसेनेच्या शाखा प्रमुखाची दादागिरी

News Desk