HW News Marathi
मुंबई

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग

मुंबई | पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनजवळ असलेल्या गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळला. पादचारी पुलाचा भाग कोसल्यामुळे पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या गोखले पूल हा दक्षिण-पश्चिम दिशेला जोडणारा पूल होता. पुलाचा भाग कोसळल्यामुळे ओव्हर हेड वायरमधील वीजपुरवठा खंडित करण्यात करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे दादर, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेसलादेखील फटका बसला आहे. बहुतांशी मेल एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.

प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग

  • अंधेरी पश्चिम रेल्वेच्या पूर्व आणि पश्चिम डेपोतून विशेष बस सोडण्यात आल्या आहेत.
  • वसई-विरारला राहणाऱ्यांना प्रवाशांसाठी बसने ठाणे-घोडबंदर मार्गे मध्य रेल्वेनंही चाकरमानी कामावर पोहोचू शकतात.
  • पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि वांद्रे येथील प्रवाशांना मध्य रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
  • पश्चिम रेल्वेचे प्रवासी आज मध्य रेल्वेवरून मोफत प्रवास करू शकतात.
  • पश्चिम रेल्वेचे प्रवासी मेट्रोने घाटकोपरवरून मध्य रेल्वेमार्गे मुंबईत कार्यालयात पोहोचू शकतात.
  • वांद्र ते चर्चगेटपर्यंतची पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू असून प्रवासी या मार्गाने प्रवास करू शकतात.
  • पश्चिम द्रुतगती मार्गानेही प्रवास करून प्रवासी मुंबईत पोहोचू शकता

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंब्राजवळ लोकलवर दगडफेक, एक तरुणी जखमी

swarit

काळू नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

News Desk

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

News Desk