मुंबई | पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनजवळ असलेल्या पादचारी पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळला. हा पुल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला पहायला मिळत आहे. या घटनेमुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
#SpotVisuals: Part of Gokhale Bridge connecting Andheri East to West has collapsed on tracks near Andheri Station. 4 vehicles of Mumbai Fire Brigade present at the spot. Traffic on Western Line held up. #Mumbai pic.twitter.com/9A4XqPMV1e
— ANI (@ANI) July 3, 2018
प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती सध्या समोर आली आहे. 7.35 वाजण्याच्या सुमारास हा गोखले पूल कोसळला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सकाळी कार्यालयात जाणा-या चाकरमान्यांची घाई असते अशा वेळी हा पुल कोसळल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.