HW News Marathi
मुंबई

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे कोहिनूर | सुधीर मुनगंटीवार

मुंबई | जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचा ५०हून अधिक संस्थांच्यावतीने मुंबईत जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजप नेते आमदार मंगल प्रभात लोढा यांनी शिल्पकार राम सुतार यांना सरस्वती देवीची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ लोढा वर्ल्ड टॉवरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विश्व प्रसिद्ध शिल्पकार व पद्मभूषण सुतार यांचा सन्मान करणे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. राम सुतार यांनी जगातली सर्वात मोठी सरदार पटेल यांची मुर्ती बनवून भारताचा गौरव वाढवला आहे. मुनगंटीवार यांनी राम सुतार यांना ‘भारताचा कोहिनूर’ म्हणत आपल्याला त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट असल्याचे द्यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी मूर्ती निर्माण करणाऱ्या राम सुतार यांचा सत्कार ‘वर्ल्ड टॉवर’ बिल्डींगमध्ये होत आहे, ही एक अद्भुत गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.
आपल्या सत्कार प्रसंगी पद्मभूषण शिल्पकार राम सुतार यांनी सरदार पटेल यांची जगातील सर्वात उंच मूर्ती आणि आपल्या सर्व रचनांचे श्रेय भारतीय संस्कृती आणि परंपरेला दिले आहे. या कार्यक्रमात ५०हून अधिक देशातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते.
जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार हे सरळ व सामान्य व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. राम सुतार यांचा आमच्या सर्वांच्या हातून सत्कार होत आहे. ही एक विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, असे लोढा म्हणाले. यावेळी युनियन बँक ऑफ इंडियाचे चेअरमन केवल होंडा आणि राजेंद्र जाधवही व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कला-संस्कृती समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेले रोको!

News Desk

दबंग शिवदीप लांडेंची धडक कारवाई

News Desk

हल्ला बोल यात्रा’ नसून ‘डल्ला मार यात्रा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk