HW Marathi
मुंबई राजकारण

डॅडी लॉकडाऊनमध्ये काय करत आहेत जाणून घ्या…

मुंबई | कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांना घरी बसून काय करावे सुचत नाही आहे. अशात बॉलिवूड स्टार, राजकीय नेते, खेळाडू आपापले छंद जोपासताना दिसत आहेत. अनेक गुन्ह्यांमुळे इतकी वर्ष जेलमध्ये असलेले अंडरवर्ल्ड डॉन अर्थात अरुण गवळी पॅरोलवर सुटले आहेत. दरम्यान, या काळात ते आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. तसा फोटो सोशल मीडीयावर पोस्ट केले आहे.

अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.परंतू पॅरोलवर बाहेर येत भायखळ्याच्या दगडी चाळीत आपल्या घरी आलेल्या गवळीने कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. डॅडींनाही पॅरोलवर सुटून या लॉकडाऊनमुळे घरातच राहावे लागत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसोबत कॅरम खेळत वेळ घालवायाला सुरुवात केली आहे. कॅरम खेळतानाही क्वीन कशी जिंकता येईल, याकडे डॅडीची नजर असल्याचेही एका व्हिडिओतून दिसून येत आहे.

Related posts

पहिल्या ट्विटमध्ये राज यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

News Desk

देशभरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, गृहमंत्रालयाकडून लेखी उत्तर

अपर्णा गोतपागर

उच्च न्यायालयाकडून शरद पवारांना दिलासा

News Desk