HW News Marathi
मुंबई

शिवाजी पार्क येथे ६० वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या रुग्णाचे वय ६० वर्षे असून त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ते राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये अनेकांच्या ते संपर्कात आल्याची भीती आहे. त्यामुळे ते राहत असलेली बिल्डिंग पोलीसांनी सील केली आहे आणि तपासकाम सुरु आहे.

तसेच, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ५३७ झाला आहे. आज (४ एप्रिल) दुपारपर्यंत राज्यात ४७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत चितेंची बाब आहे. आरोग्य यंत्रणा अथक प्रयत्न करत आहेच शिवाय पोलीस यंत्रणाही त्यांना साथ देत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘कोरोना’चे ४७ नवीन रूग्ण आढळल्याने ‘टेन्शन’ वाढले

News Desk

ईद मिलाद-उन-नबी या दिवशी राणीबाग नागरिकांकरीता खुली राहणार 

News Desk

कर्जमाफीच्या गोंधळाला सरकार नाही तर पत्रकार जबाबदार – सहकार मंत्र्यांचा अजब तर्क

News Desk