HW News Marathi
मुंबई

घर अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर, 18 तासांनंतरही ‘ते’ घरी परतलेच नाहीत !

मुंबई- मंगळवारच्या पावसानंतर अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घरी पोहोचण्यासाठी निघालेली एक व्यक्ती बुधवारी घरी दाखल झालेली नाही. ही व्यक्ती कोणा सर्वसामान्य माणून नसून बॉम्बे हॉस्पिटलमधील एक नामांकित डॉक्टर आहेत. दीपक अमरापूरकर असे त्यांचे नाव आहे. ते कालपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे.

मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्यारस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली होती. वरळी ते परळ रस्त्यावर गळ्यापर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे अनेक लोकांनी कार आहे तिथेच सोडून पाण्यातून वाट काढणे पसंत केले. डॉ. दीपक अमरापूरकर हे सुद्धा हॉस्पिटलमधून प्रभादेवीला घराकडे जायला निघाले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ते प्रभादेवीच्या दीपक सिनेमाजवळ पोहोचले. त्या ठिकाणी प्रचंड पाणी तुंबले होते. त्यामुळे अमरापूरकर हे कारमधून उतरले आणि त्यांनी ड्रायव्हरला कार घरी आणण्यास सांगितले. त्यानंतर ते पुढे पाण्यातून मार्ग काढत चालत गेले. काही वेळात त्यांचा ड्रायव्हर घरी पोहोचला. पण डॉक्टर घरी आलेच नाहीत. त्यांचा फोनही लागत नाही, असे बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे ते ज्या ठिकाणाहून गायब झाले ते ठिकाण त्यांच्या घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असल्याचे भन्साळी यांचे म्हणणे आहे. सध्याया डॉक्टरचा शोध सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बच्चे कंपनीसाठी अनोख पुस्तक प्रदर्शन

swarit

 दिव्याचा दिव्य अभिनय, तीन तास जमिनीखाली

News Desk

कमला मिल परिसरात इमारतीला आग

News Desk