HW News Marathi
मुंबई

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचारप्रकरणी शिपाई अटकेत

मुंबई – मालाड पूर्वेकडील अप्पर गोविंद नगर येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेत शाळेतीलच शिपायाने एका 4 वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 26 वर्षीय आरोपी शिपाईला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.

मालाडच्या पोद्दार शाळेत शिकत असलेल्या 4 वर्षीय मुलीला शौचालयात नेण्याच्या बहाण्याने आरोपीने मुलीला शौचालयात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शनिवारी शाळा सुटल्यावर मुलगी घरी गेली असता तिला त्रास होऊ लागल्याचे मुलीने आईला सांगितले. आईने मुलीकडे चौकशी केली असता तिने शाळेत घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासणी केली असता शिपाई मुलीला शौचालयात घेऊन गेल्याचे दिसले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या शिपाई विरोधात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून रविवारी शिपाई विशाल सरडे याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली.

घटनेनंतर शाळेत उमटले पडसाद

या घटनेची पालकांना कुणकुण लागताच मंगळवारी हजारोच्या संख्येने संतप्त पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली. यावेळी पालकांनी शाळेबाबत सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी दिंडोशी पोलिसांनी मध्यस्थी करत संतप्त पालकांना शांत केले. यावेळी शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

swarit

प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला देऊ नयेत | पवार

Gauri Tilekar

मरे’चे रडगाणे सुरूच

News Desk