मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पुढच्या १ महिन्यात मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट सादर करण्याचे आदेश स्ट्रक्चरल ऑडिट कंपन्यांना दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने हा पूल आमच्या हद्दीत येत असून या दुर्घटनेतील दोषी आढळल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) directs one of their consultants to carry out inspections and review the structural audit report of 157 bridges in Mumbai within one month and submit the same with a detailed investigation on a 'most urgent' basis. #Maharashtra pic.twitter.com/7udwDc8uca
— ANI (@ANI) March 16, 2019
सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळून गुरुवारी (१४ मार्च) झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील, एस.ओ.कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे व सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते या अधिकाऱ्यांचे शुक्रवारी (१५ मार्च) निलंबन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदार असलेल्या आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला, ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.