HW News Marathi
मुंबई

डीजेवरील बंदी कायम | उच्च न्यायालय

मुंबई | मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या सणांसाठी तयारी सुरु झालेली आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात देखील डीजे वाजविण्यावर बंदी होती. सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपल्यानंतर आता डीजेवरील बंदी तूर्तास उठवण्याची मागणी करणारी पाला संघटनेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावरून डीजेला राज्य सरकारचा विरोध कायम आहे. यंदाचा गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे सण आता संपल्यानंतर तरी उच्च न्यायालयाने ही बंदी तूर्तास उठवावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने याला तीव्र विरोध केल्याने उच्च न्यायालयाने ही बंदी उठवण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती के. के. सोनावणे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील प्राध्यापकाची इराणी विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

News Desk

ओम पुरी यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

News Desk

शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार!  –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna