HW News Marathi
मुंबई

बाप्पाच्या मुर्ती साकारण्यास सुरुवात , आदिवासी मुलांना रोजगार

मुंबई | पाऊसाला सुरुवात झाली, की आपल्या सर्वांना चाहूल लागते ती बाप्पाच्या आगमनाची. यंदा १३ सप्टेंबरला बाप्पा आपल्या घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात विराजमान होणार आहेत. बाप्पा जेव्हा घरी किंवा मंडळात येणार असतो. तेव्हा आपण सर्वजण घर आणि मंडळाची सजावट करण्यात मग्न होतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की, बाप्पांचे आगमन जरी १३ सप्टेंबरला होणार असले तरीही बाप्पांच्या मुर्ती घडवण्याची सुरुवात ही मे महिन्यापासून होते. होय, हे खरे आहे. की, बाप्पाच्या मुर्ती साकारण्यासाठी मे महिन्यापासून सुरुवात होते. मी अशाच एका बाप्पांच्या मुर्ती बनविणा-या मुर्तीकार कुणाल पाटील यांच्या कार्यशाळेला भेट दिली. ही कार्यशाळा परळ येथील सेंट्रल रेल्वे मैदानात आहे. या कार्यशाळेत मे महिन्यापासून मुर्ती साकारण्यास सुरुवात झाली आहे.

के. पी आर्टस

कुणाल पाटील यांच्या कार्यशाळेचे नाव के. पी. आर्टस असे आहे. २०१५ पासून मुर्ती बनविण्याच्या या कार्यशाळेला आता चार वर्षपुर्ण झाली आहेत. कार्यशाळेत ६ ते २१ फुटापर्यंतच्या मुर्त्या घडविल्या जातात. मे महिन्यामध्ये काही सार्वजनिक गणेश मंडळे आपआपल्या मंडळाच्या बाप्पाच्या मुर्तीच्या डिजाईन कशी असावी, ती किती फुटाची असावी, असे सांगतात. या कार्यशाळेत आतापर्यंत १२ सार्वजिनक गणेश मुर्तींचे बुकिंग झाले आहे. प्रथम बाप्पाच्या मुर्तीचे चित्र काढून त्या मंडळांच्या सदस्यांना दाखवून त्यांच्या आवडीप्रमाणे बाप्पाच्या मुर्त्या घडविल्या जातात. त्यानंतर बाप्पाची मुर्ती साकारण्याआधी त्यांचा साचा बनविला जातो.

केरळचा काता

पीओपी आणि काता हे एकत्र करुन साचात टाकले जाते. मग बाप्पाच्या मुर्तीला आकार दिला जातो. पीओपीमध्ये वापरण्यात येणारा काता हा दुकानात मिळणारा काता नसून हा काता नारळाचा काता आहे. गणेशमुर्तींसाठी केरळवरुन हा काता मागविला आहे. काता आणि पीओपीमध्ये एकत्र करुन मुर्तीच्या साचात टाकले जाते. यानंतर बाप्पाच्या मुर्तीला प्रथम आकार येतो. बाप्पाची लोभसवाणी आणि मन हरवून जाणारी मुर्ती घडविण्यासाठी १० टप्पे असतात. पी. के. आर्टस यांच्या कार्यशाळेत बाप्पाच्या मुर्तीचे काम पहिल्या टप्प्यात आहे.

आदिवासी मुलांना उपलब्ध झाला रोजगार

के. पी. आर्टसमध्ये पालघर जिल्ह्यातील ५० आदिवासी मुले आहेत. या आदिवासी मुलांना बाप्पाच्या मुर्ती साकारुन चांगले पैसे मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यामधील सुप्त गुणाणा देखील वाव मिळत आहे. या आदिवासी मुलांपैकी बहुशांत मुलांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे.

“मी बाप्पाच्या मुर्तीला आकार देणे आणि फिनिशीग देण्याचे काम करतो. मला लहानपणापासून मुर्ती बनविण्याची आवड होती. परंतु माझी ही आवड फक्त माझ्या पाड्या पुरती मर्यादीत होती. पण जेव्हा माझ्या कलागुणा वाव मिळाला आणि माझ्यातील बाप्पाची मुर्ती बनविण्याच्या गुणांचे मला चांगले पैसे मिळू लागल्यानंतर मी माझ्या शेतीत पारंपारिक भात शेतीबरोबर इतर पीक ही घेऊ लागल्याने मला चांगला नफा झाला. गेल्या वर्षी मी माझ्या शेतीत कारल्याचे पीक घेतले होते. मला कारल्याच्या पिकातून ५४ टन उत्पादन मिळाले होते. यातून मला बाजार भावाने चांगले पैसे देखील मिळाले. अशी माहिती के पी आर्टस मधील मुर्तीकार गणेश दुतकर यांनी दिली. या तरुण मुर्तीकारांकडे पाहून बाप्पाने दिली रोजगारांची संधी असे म्हणायला काही हरकत नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौरी लंकेश हत्येचा मुंबई पत्रकार संघाकडून निषेध

News Desk

दादरमध्ये दिवसाढवळ्या हत्या

News Desk

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna