HW News Marathi
मुंबई

बेलापूरची लोकल वेस्टर्नच्या ट्रॅकवर , हार्बर रेल्वेचा सावाळा गोंधळ

मुंबई | मुंबईची लाईफ लाइन समजली जाणारी लोकल अनेकदा मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरते. असाच अनुभव सोमवारी रात्री मुंबईकरांना आला. रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे हा गोंधळ झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले.

सीएसएमटी वरुन बेलापूरला जाणारी ९.३८ ची लोकल मोटरमनने चुकून पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर नेली. वडाळा स्थानक सोडल्यानंतर ही गोष्ट प्रवाशांच्या लक्षात आली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. अखेर रेल्वे प्रशासनाला आपली चूक लक्षात आली.

किंग्ज सर्कल स्थानकावर त्यानंतर या गाडीतील सर्व प्रवाशांना उतरविण्यात आले. या गोंधळाबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मात्र, तोपर्यंत या साऱ्या गोंधळामुळे हार्बर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनावर प्रवाशांनी रोष व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

News Desk

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची रेस्क्यू टीम अवनीच्या शोधात

News Desk