HW News Marathi
मुंबई

भेंडीबाजार इमारत कोसळून आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी

मुंबईः मंगळवारी मुंबईत झालेल्या प्रलंयकारी पावसामुळे जीर्ण इमारती धोक्यात आल्या असून गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास भेंडी बाजार परिसरातील सव्वाशे वर्षे जुनी इमारत भूईसपाट झाली. यात 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे.

जे. जे. जंक्शन येथील पाकमोडिया स्ट्रीटवर सकाळी आठच्या सुमारास पाच मजली निवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत 23 जण मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत. मदतकार्यासाठी घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही रवाना झाल्याचे समजते. ही इमारत १०० ते १२५ वर्षे जुनी असल्याचे स्थानिक नगरसेवक अतूल शहा यांनी सांगितले. सकाळची वेळ असल्याने कुटुंबातील अनेक जण घरातच होते असे समजते. गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलैरोजी घाटकोपरमध्ये साई दर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

 

मृतांचे आणि जखमींचे नाव

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने केली आत्महत्या

News Desk

परळमधील महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग

swarit

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतील गैरप्रकाराची न्यायालयीन चौकशी करा | धनंजय मुंडे

News Desk