HW Marathi
मुंबई

भीमा कोरेगाव :… अटक सत्र जाहिर निषेध- सचिन सावंत

मुंबई, भीमा कोरेगावच्या घटनेनंतर पोलिसांकडून कोंबिग ऑपरेशन सुरु असून अनेक तरूण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी, रात्री अपरात्री घरात घुसून अटक करण्यात येत आहे. आतापर्यंत विविध ठिकाणाहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट आहेत. मनुवादी विचारधारेच्या सरकारच्या इशा-यावर पोलीस कारवाई करत आहेत अशी भावना दलित समाजात निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या कारवाईचा आणि अटकसत्राचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करित असून सदर अन्यायी कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

Related posts

कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकाचा कॉन्टॅएक्ट ट्रेसिंगवर भर

News Desk

कस्तुरबाने कोरोनाबाधितांना कोरोनामुक्त करण्यात गाठली ‘शंभरी’

News Desk

मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ओव्हरफ्लो

News Desk