HW News Marathi
मुंबई

निसर्गाने लादलेल्या अंधत्वावर मात करत फोडली दहीहंडी

मुंबई | थरावर थर लावणारे गोविंदा बघितले की बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पण हे थर लावणारे गोविंदा जर दृष्टीहिन असतील तर? होय.. आणि हे करून दायखवलंय ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर ब्लाइंट या शाळेच्या दृष्टीहिन विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून जगासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.

निसर्गाने लादलेल्या अंधत्वावर मात करत आपल्या विशेष कौशल्याने थरावर थर रचत या मुलांना ज्या उत्साहाने दहीहंडी फोडली हे अत्यंत कौतुकास्पद आहे. २००१ पासून गेली १८ वर्ष व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर ब्लाइंट या शाळे मार्फत दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या मुलांना जग पाहता येत नाही. स्पर्शातून जग पाहण्याचा ही मुलं प्रयत्न करत असतात. त्यांना सामान्य व्यक्ती जे करतो ते करण्याची संधी मिळत नाही.

त्यामुळे व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल तर्फे दरवर्षी आम्ही दहीहंडी उत्सवाचे आमच्या शाळेत आयोजन करतो. त्यांना आनंद मिळावा वेगळं काही तरी करता यावं यासाठी आमचा हा प्रयत्न असतो. त्याच प्रमाणे ही मुलं गेल्या आठवड्या भरापासून त्यांच्या पिटीच्या शिक्षकांन सोबत दहीहंडीची तयारी करत आहेत. असे प्रशासकीय लिजी सॉबी यांनी एच डब्लू मराठी ला सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार, मुंबईकरांचे हाल

News Desk

राष्ट्रवादीचा गड असलेला पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व

News Desk

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna
क्रीडा

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk

मुंबई | आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेतून कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार असल्याचे वृत्त आहे. तर उपकर्णधार पदाची जबाबदारी शिखर धवनकडे असणार आहे. वेगवान गोलंदाज खलील अहमद या संघातील नवा चेहरा आहे. १५ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होईल. १८ सप्टेंबरला भारताचा स्पर्धेतील पहिला सामना होईल.

विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल. तर शिखर धवन उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची जबाबदारी या दोघांसह के. एल. राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांच्यावर असेल. भारतीय गोलंदाजीची धुरा फिरकीपटू कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद यांच्या खांद्यावर असणार आहे.

Related posts

कोहलीचे बॉलिवूडमध्ये विराट पदार्पण ?

swarit

आम्हाला बीसीसीआयने सदस्यत्व द्यावे, तेलंगना क्रिकेट असोसिएशनची मागणी

News Desk

कॅप्टन कुलचा हा व्हिडिओ पाहिलात का ?

News Desk