HW News Marathi
मुंबई

आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक

मुंबई | मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर डागडुजीसाठी आज (२ जून) ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेवर काल (१ जून) रात्रकालीन ब्लॉक घेऊन डागडुजीचे काम पूर्ण करणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर आज सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याणहून सीएसएमटी दिशेकडील सुटणाऱ्या लोकल सेवेत बदल करण्यात येणार आहे. कल्याण ते मुलुंड या दरम्यान लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. धिम्या मार्गावरील लोकल सेवा ब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर उपलब्ध नसेल.

हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे लोकल रद्द करण्यात येणार आहे. तर सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर १ जूनच्या मध्यरात्री वसई रोड ते वैतरणा स्थानकापर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट दिशेकडील जलद मार्गावर १ जूनच्या रात्री ११ वाजून ५० मिनिटांपासून ते २ जूनच्या मध्यरात्री २ वाजून ५० मिनिटांपर्यंत ३ तासांचा हा ब्लॉक असेल. २ जूनच्या मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ३ तास विरार दिशेकडील जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येरवडा कारागृहात कैद्याचा खून

News Desk

मनसे कार्यकर्त्यांकडून गुजराती पाट्यांची तोडफोड

News Desk

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ज्येष्ठ मतदारांनी ‘या’ उपक्रमातंर्गत केले मतदान

Aprna