HW News Marathi
मुंबई

चेंबूरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई | नालंदा एज्युकेशनल फाउंडेशन (संचलित) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य, विज्ञान आणि सेल्फ फायनान्स वरिष्ठ महाविद्यालय चेंबूर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर वि. सी. गांधी आणि एम. ए. वोरा म्युनिसिपल सेंट्रल हॉस्पिटल राजावाडी मुंबईच्या सहयोगाने आयोजित केले गेले होते. या रक्तदाब शिबिराचे उदघाटन विभागातील विद्यमान नगरसेविका संगिता हंडोरे यांनी केले.

या संपूर्ण रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. हॉस्पिटलमधील डॉ. जाधव, डॉ. अश्विनी आणि डॉ. जयदीप या डॉक्टरांनी येथे सहभाग दर्शविला. महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या विभागाचे प्रमुख प्रा. अनिल खर्चे आणि प्रा. दीपिका फुलवाडिया यांनी ५० विद्यार्थ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम पार पाडला. संस्थेच्या प्रमुख सोनल शेंडकर तसेच प्राचार्य नितीन कदम आणि उप प्राचार्य एम शक्तीवेल याच्यासह महाविद्यालयातील सर्व शाखेचे शिक्षक तसेच कर्मचारी वर्गाने सहभाग दर्शविला.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आपल्या समाजाला रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम हे अशाच उपक्रमांच्या माध्यमातून केले जाते. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा अशा शिबिरांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होतात अशी माहिती उपस्थित शिक्षकांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत

News Desk

तिसऱ्या दिवशीही जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन सुरु

News Desk

विसर्जनानंतर स्वच्छतेसाठी दादर चौपाटीवर पर्यावरण प्रेमी एकटले

swarit