HW News Marathi
मुंबई

अक्सा बीचवर ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने ५४ पर्यटकांना दंश

मुंबई | मुंबईतील बीचवर ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने आतापर्यंत ५४ जणांना दंश केला आहे. रविवार (आज) सुट्टीच्या दिवशी समुद्र किनारी फिरण्यासाठी गेलेल्या ४ पर्यंटकांना जेलीफिशने दंश केला आहे. शनिवारी अक्सा बीचवर गेलेल्या जवळपास ५० पर्यटकांना ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने दंश केला आहे. बीचवर अनवाणी पायांनी पाण्यात उतरलेल्या पर्यटकांना या जेलीफिशने डंग मारला आहे. या घटनेनंतर बीचवरील जीवरक्षकांनी तातडीने पर्यटकांनर उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले.

मुंबईतील प्रत्येक बीचवर फिरण्याचा आनंद जरूर घ्या, परंतु थोडीशी काळजी देखील घ्यावी. तसेच अनवाणी पायाने समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ‘ब्लू बॉटल’ नावाचे जेलीफिश पावसाळ्याआधी समुद्र किनारी येतात. ‘ब्लू बॉलट’ जेलीफिश विषारी असतात. या जेलीफिशच्या दंशाने त्या ठिकाणी लाल रंगाचे सुज येऊन गाठ येते. तसेच जेलीफिशच्या दंशाने असह्य अशा वेदना होतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहीद कॉन्स्टेबल स्व. विलास शिंदे चौक

News Desk

सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार, तटकरेंची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता ?

News Desk

अभाविपच्या संघर्षाला यश, उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात चौकशी समितीची घोषणा

News Desk