HW News Marathi
मुंबई

कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात येणार

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन अनेक उपाययोजना करत आहेत. मुंबईत कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता ज्यांना कोरोना सदृश्य लक्षमे आढळत असतील अशांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी पालिकेने पूर्ण मुंबईत ‘फिव्हर क्लिनिक’ सूरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, वरळी कोळीवाड्याही सील करण्यात आला आहे आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन कोरोना चाचणी करणे शक्य नसल्याकारणाने आरोग्य शिबीराचे आयोजन आजपासून (१ एप्रिल) करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान, या शिबिराआंतर्गत ज्यांना सर्दी, ताप आणि खोकला वाटत असल्यास या शिबिरातील क्लिनिकमध्ये जाऊन त्यांनी तपासणी करायची आहे. मुंबईतील २४ वॉर्ड्समध्ये हे क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल (३१ मार्च) नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवल्याने महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व खाजगी दवाखाने, पॅथॉलऑजी. मेडिकल स्टोअर्स हे खुले ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, फिव्हर क्लिनिक हे झोपडपट्टी परिसरांमध्येही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चर्चगट स्टेशनजवळ हॉर्डिंग कोसळून एका वृद्धाचा मृत्यू

News Desk

येत्या ४८ तासात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

News Desk

देशात लोकशाही धोक्यात – जावेद अख्तर

News Desk