HW News Marathi
मुंबई

Breaking News | चेंबूर मधील बीपीसीएल मध्ये स्फोट

मुंबई | मुंबईतील चेंबूर परीसरात दुपारच्या दरम्यान अचानक स्फोट झाला आहे. चेंबूर मधील बीपीसीएल मध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या सध्या घटनास्थळी हजर झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्तीचे पर्यंत सुरु आहेत. बीपीसीएल परीसरात मोठ मोठे धुराचे लोळ पसरल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. माहुल परीसरात धुराचे साम्राज्य आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

LIVE UPDATES

 

 

  • बाहेर येणा-या कर्मचा-यांच्या अंदाजानुसार हा आकडा वाढण्याची शक्यता
  • २३ लोक जखमी, ही संख्या वाढण्याची शक्यता

 

  • आगीवर ७० टक्के नियंत्रण.
  • जखमींवर आतमध्ये उपचार सुरु, बीपीसीएल कडून माहितीसाठी पत्रक जारी.
  • अधिकृत माहिती ५ वाजेपर्यंत समोर येण्याची शक्यता.
  • २५ रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल.
  • २ वाजून ५५ मिनीटाला ही घटना घडल्याची माहिती.
  • सुरक्षेत कमी पडू नये यासाठी सध्या प्रयत्न केला जात आहे.
  • बीपीसीएल हा देशातला सर्वात मोठा पेट्रोलिएम प्रकल्प.
  • या स्फोटामुळे आजुबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या.
  • स्फोट झालेल्या स्थळावर २०० कर्मचारी होते कामावर.
  • कर्मचा-यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
  • संपर्क करण्यासाठी अडचण.
  • ५०० ते ६०० कर्मचारी आतमध्ये आहेत.
  • आगीत दहा पेक्षा अधिक लोक जखमी
  • सतर्क मुंबईकर गर्दी हटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
  • चेंबूर नाक्यापर्यंत सदर स्फोटाचा आवज आल्याची प्रत्यक्ष दर्शींची प्रतिक्रिया
  • अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल.
  • गेल्या १ तासापासून कंपनीत आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य
  • १० पेक्षा अधिक कर्मचारी जखमी
  • बीपीसीएलच्या हायड्रो क्रॅकर युनिटमध्ये स्फोट
  • डॉक्टरांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल.
  • अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल.
  • परीसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
  • घटनेत चार ते पाच जण गंभीर जखमी
  • सहा रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल

  • प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे स्पोटाच्या आवाजाने माहुलगाव हादरुन गेले आहे.
  • कामगारांच्या बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न
  • कर्मचा-यांशी संपर्क तुटल्यामुळे भीतीचे वातावरण, नातेवाईक आप्तस्वकीय काळजीने धास्तावले.
  • सल्फर प्लँटला आग लागली आहे.
  • अनेक विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन या विभागात करण्यात आले आहे.
  • मुंबईतील सर्वात दाट लोक असलेला हा विभाग
  • परीसरात हिंदुस्थान पेट्रोलियमची देखील एक रीफायनरी
  • काही कामगार आत अडकल्याची भीती |आमदार तुकाराम काते
  • चेंबूर परीसरात स्फोट
  • बीपीसीएल मध्ये स्फोटाचा आवाज
  • स्फोटाच्या आवाजाने माहुल गाव हादरले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑटिझम मुलांसाठी उपचार आणि मार्गदर्शन

swarit

श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवडू कलाकार आणि चाहात्यांची गर्दी

News Desk

पालिका नव्हे यंदा गणेश मंडळेच बुजविणार खड्डे

News Desk