HW Marathi
मुंबई

१ एप्रिलपासून म्हशीचे दूध प्रतिलीटर २ रुपयांनी महागणार

मुंबई | येत्या १ एप्रिलपासून म्हशीचे दूध हे प्रतिलीटर दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे ६४ रुपये प्रतिलीटर इतका असलेला म्हशीच्या दूधाचा होलसेल दर वाढून ६६ रुपये प्रतिलीटर इतका होणार आहे. तर किरकोळ बाजारात म्हशीच्या दूधाचा दर ७० ते ७५ रुपयांपर्यंत जाणार आहे. दरम्यान, ही वाढ केवळ सुट्या दुधाच्या किंमतीतच होणार आहे. पाकिटबंद दुधाच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. अमूल, गोकूळ, गोवर्धन यांसारख्या पाकिटबंद दूधाचे दर कायम राहतील.

१ एप्रिलपासून सुट्या म्हशीच्या दूधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ होईल. त्याचप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत ही वाढ कायम राहिल, असे मुंबई मिल्क असोसिएशनने स्पष्ट केले आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या किंमतीत दिवसेंदिवस होणारी वाढ त्याचप्रमाणे कामगारांचा पगार, वाहतूक खर्च यासारख्या गोष्टींमुळे दूधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय मुंबई मिल्क असोसिएशनने घेतला आहे. मुंबई आणि ठाण्यात जवळपास १,७०० डेऱ्या या मुंबई मिल्क असोसिएशन अंतर्गत येतात.

Related posts

जनतेची दिशाभूल केल्याबद्दल सरकारने माफी मागावीः विखे पाटील

News Desk

सिंधिया हाऊस इमारतीला आग

धनंजय दळवी

उरणच्या खोपटा पुलावर दहशतवादी संघटनेच्या मजकूराने खळबळ

News Desk