HW Marathi
मुंबई

अंधेरीमधील मरोळ परिसरातील इमारतीत बिबट्या घुसला

मुंबई | अंधेरीतील मरोळ परिसरातील इमारत बिबट्या घुसला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळाता वनविभागाने पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. वूडलँड सोसायटीत बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरे कॉलनीपासून १०० मीटरच्या अंतरावरच हा परिसर आहे. सोसायटीमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वूडलँड सोसायटीत बिबट्या घुसल्याची वार्ता पसरल्याने या परिसरात बघ्यांनी एकच गर्दी केली आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सोसायटीत जाण्यापासून स्थानिकांना मज्जाव करण्यात येत आहे. दरम्यान, वन विभागाचे अधिकाऱ्याकडून सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Related posts

मुंडे आणि परिचारक यांचा विधानसभेतील उल्लेख वगळा जाणार

News Desk

प्रभादेवीच्या ब्यूमॉंन्ट इमारतीला आग

News Desk

महिलेवर बलात्कार करून हत्या ?

News Desk