HW News Marathi
मुंबई

चर्चच्या महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे

मुंबई : महिला प्रसाधनगृहात कॅमेरे आढळण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असतात. आता मात्र चक्क ख्रिस्ती प्रार्थनास्थळाच्या प्रसाधगृहात हा प्रकार घडल्याने भाविकांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबईतील सर्वात जुनं चर्च असलेल्या सेंट मायकल चर्चच्या महिलांच्या प्रसाधनगृहात हा सीसीटीव्ही कॅमेरा आढळला आहे. याची आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड गेसियस यांनी गंभीर दखल घेतली असून चर्चला पत्र पाठवून त्याबाबतची विचारणा करण्यात आली आहे.

पोर्तुगीजांनी १५३४ मध्ये माहिम येथे हा चर्च बांधला होता.

या प्रकरणाची आर्चबिशप गेसियस यांच्यासह असोसिएशन ऑफ कन्सर्न्ड कॅथलिक्सचे उपाध्यक्ष केरेन सी डिसूजा यांनीही गंभीर दखल घेऊन चर्चला पत्र पाठविले आहे. सेंट मायकलचे पादरी दिवसे न् दिवस हस्यास्पद वागत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांना काय कॅप्चर करायचे आहे? कोणत्या महिलेची पँट सरकलेली आणि कोणत्या महिलेची साडी निसटलेली आहे, हे पादरीला पाह्यचे आहे का?,असा सवाल करतानाच महिलांच्या एकांताच्या अधिकाराचे हे उल्लंघन आहे. पादरींनी जागं व्हायला हवं. महिलांचा आदर व्हावा. इथे लाइव्ह पोर्न बघण्यासाठी गर्दी व्हावी, असं आम्हाला वाटत नाही, असा टोलाही असोसिएशन ऑफ कन्सर्न्ड कॅथलिक्सचे उपाध्यक्ष केरेन सी डिसूजा यांनी पत्र पाठवून लगावला आहे.

चर्च लवकरच हे सीसीटीव्ही कॅमेरा हटवेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. महिलांची सुरक्षा व्हावी आणि चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी चर्चमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. पण नको तिथे कॅमेरे बसविले. जरवॉशरूममध्येही चोरी होऊ शकते असे वाटत असेल तर मग वॉशरूमच्या ५० मीटर परिसरातही सुरक्षा रक्षक तैनात करायला हवेत, असं डिसूजा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहा उद्धव ठाकरे यांना भेटणार नाहीत – आशिष शेलार

News Desk

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

आकाशवाणीचे वृत्त निवेदक संपावर

News Desk