HW News Marathi
मुंबई

कृषीमंत्र्यांना भेटू द्या, अन्यथा सातव्या मजल्यावरून उडी मारेन video

कृषीमंत्र्यांना भेटू द्या, अन्यथा उडी मारेन अशी धमकी देत शुक्रवारी दुपारी एक तरुण मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर पोहोचला. या तरुणाला खाली उतरवण्यात आले असून पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले आहे. तरूणांने सातव्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी देतच मंत्रालयाच्या आवारात गोंधळ उडाली.

शुक्रवारी दुपारी एक तरुण मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पोहोचला. सातव्या मजल्यावर खिडकी बाहेरील सज्जावर तो उभा राहिला. मला कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटू द्यावे, अन्यथा इथून उडी मारेन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. तरुणाच्या या इशारानंतर सुरक्षा यंत्रणाही कामाला लागल्या. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून पोलीसही त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्रालयाजवळ बघ्यांची गर्दीही वाढली आहे. या घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री रणजित पाटील हेदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे हेदेखील सातव्या मजल्यावर पोहोचल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आझाद मैदान येथे माथाडी कामगारांचे बेमुदत उपोषण

swarit

आगामी निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार

News Desk

जातियवाद्यांना राज’वार’, एका दणक्यात सगळेच गपगार…! राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग

News Desk