HW News Marathi
मुंबई

नगरसेवकांवर आता लवकरच सीसीटीव्हीची नजर

मुंबई | देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेतील नगरसेवकावर आता लवकरच सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे. पालिका सभागृहाच्या हजेरी पुस्तीकेवर सही करून सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता. चक्क सभागृहाबाहेरून पळ काढणाऱ्या नगरसेवकांसाठी आता बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच पालिका सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होणाऱ्या नगरसेवकांवर आता सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मात्र यातून महापौर आणि उपमहापौर यांना या निर्णयातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे पळ काढणा-या नगरसेवकांना या निर्णयाची चांगलीच झळ बसणार आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या नगरीतील विकास कामावर , समर-या आणि अनेक विषयावर पालिकेच्या सभागृहात चर्चा केली जाते. विकास कामे मंजुर केली जातात. धोरणात्मक निर्णयही घेतले जातात. अशावेळी नगरसेवकांची उपस्थिती महत्त्वाची असते. केवळ हजेरी नाही तर पुरेशी संख्याही महत्त्वाची असते. पालिका सभागृहाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांना सभागृहाबाहेरील नोंदवहीमध्ये सही करून प्रवेश दिला जातो. परंतु अनेक वेळा नगरसेवक येथे हजर नसतात. तर काही नगरसेवक केवळ नोंदवहीत हजेरी लावून परस्पर घरी निघून जातात. अशावेळी महत्वाच्या निर्णयावर निर्णय घेताना, राजकीय पक्षांना अडचणीस सामोरे जावे लागते. मुंबईतील समस्यांचे निराकरण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

मात्र, काही नगरसेवकांना सभागृहातील कामकाजाची माहिती नसते. परिणामी नगरसेवकांचा सभागृहाच्या कामकाजात सहभाग असावा यासाठी सभागृहाच्या दरवाजाच्यावर बायोमेट्रीक मशीन आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. महापौरांनी ही मागणी मंजूर करुन पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवली. आयुक्त अजोय मेहता यांनी यावर सकारात्मक अभिप्राय देताना, सीसीटीव्ही यंत्रणा आणि बायोमेट्रीक मशीन लावण्याचे निर्दश प्रशासनाला दिले आहेत. यातून महापौर व उपमहापौर यांना वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल होणार; उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार

Aprna

पश्चिम रेल्वेच्या महिलाडब्यांचे आकर्षक रुप पाहिले का…

News Desk

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

News Desk
महाराष्ट्र

अभाविप आयोजित १७ वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन लातूरला होणार

News Desk

मुंबई | महाराष्ट्रातील विद्यार्थी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी १९९६-९७ मध्ये अभावीपने सुरू केलेले राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभासंगम यंदाचे १७ वे वर्ष असून ते २९-३० सप्टेंबर रोजी ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी, दयानंद सभागृह, लातूर येथे संपन्न होत आहे. आता पर्यंत अमळनेर, रत्नागिरी, पुणे, डोंबिवली, नांदेड, सोलापूर, जळगाव, मुंबई, गोवा, सांगली, परभणी आदी शहरात यापूर्वी हे संमेलन पार पडले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व नामवंत साहित्यिकांची हजेरी यामुळे याचा आलेख वाढतच गेला. यावेळी कथा, कविता, पटकथा, वैचारिक लेख, कथाकथन व ब्लॉग लेखन आदी विषयात विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

दोन दिवसीय संमेलनात दिंडी, जाहीर उदघाटन, महाविद्यालय प्राध्यापक / प्रमुखांचे एकत्रीकरण, नामवंत साहित्यिकांची प्रकट मुलखात, कथा / वैचारिक लेख / पथ नाट्य लेखन – सादरीकरण / अनुदिनी लेख, निवडक विद्यार्थी कवींचे प्रातिनिधिक कविसंमेलन व कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, समारोप / पारितोषिक वितरण अशी कार्यक्रमांची रेलचेल या दोन दिवसात होणार आहे. या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ कवयित्री डॉ सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते होणार आहे. ‘वाचन संस्कृती’ या विषयावर मुख्य भाषण भूषण गगराणी (प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय) यांचे होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाहीर हेमंतराज मावळे ‘लोककला महाराष्ट्राची’ कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची प्रकट मुलखात या संमेलनात ऐकायला मिळणार आहे. हे प्रतिभासंगम मराठवाड्यात असल्याने ‘शेती : वास्तवातील व साहित्यातील’ हा परिसंवाद योजिला आहे, या परिसंवादात प्रामुख्याने इंद्रजीत भालेराव उपस्थित राहणार आहेत. नवोदित साहित्यिकांच्या साहित्य प्रकारानुसार मान्यवर साहित्यिकांसोबत गटशः चर्चा या प्रतिभासंगम मध्ये होणार आहेत. प्रतिभासंगम चे पारितोषिक वितरण प्रवीण तरडे ( फर्जंद-देऊळबंद फेम अभिनेते) यांच्या हस्ते होणार आहे. या दोन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनाचा समारोप जेष्ठ पत्रकार व लेखक अरुण करमरकर यांच्या भाषणाने होणार आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र आयोजित १७ वे राज्यस्तरीय प्रतिभासंगम विद्यार्थी संमेलनात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होवून संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ, प्रदेश उपाध्यक्ष प्रा अनिल मस्के व प्रतिभासंगम २०१८ निमंत्रक प्रसाद जाधव यांनी केले आहे.

Related posts

“चंद्रकांतदादांचे 200+चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या”, राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

News Desk

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका!

News Desk

“जर आम्ही घाबरलो असतो तर…”, अजित पवारांचे फडणवीसांना उत्तर

News Desk