HW News Marathi
मुंबई

लोकलचे चाक रुळावरुन घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

मुंबई | मध्य रेल्वे मार्गावर रविवारी (२६ मे) दिवसभर मेगाब्लॉक असताना रात्री वाहतूक सुरळीत होणार होती. परंतु विद्याविहार ते कुर्ला स्थानकादरम्यान रात्री ९ वाजेच्या सुमारास धीम्या मार्गावरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या एका लोकलच्या डब्याचे चाक रुळावरुन घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला स्थानकाच्या तिसर्‍या प्लॅटफॉर्मवर घसरल्याने मध्य रेल्वे सुमारे दोन तास ठप्प झाली.

यामुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील २० हून अधिक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. लोकल घसरलेल्या मार्गावर मध्य रेल्वेच्या धिम्या लोकलच्या रांगा घाटकोपर स्थानकापर्यंत लागल्या आणि अडकलेल्या प्रवाशांचे हाल झाले. याशिवाय धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावरही वळवण्यात आल्या व त्या तुडुंब गर्दीने धावत होत्या. रात्री ९ वाजता घसरलेली रेल्वे ११ च्या सुमारास पुन्हा रूळावर चढवण्यात आली व तिला कारशेडला पाठवल्यानंतरच हा मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतरच पुन्हा लोकल गाड्या धावण्यास हळू हळू सुरूवात झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या अधोगतीला शिवसेना जबाबदारः पृथ्वीराज चव्हाण

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याने थकविले साडेसात लाखांचे पाण्याचे बिल

News Desk

जातीय सलोखा वाढवण्यासाठी जमाते इस्लामीची मोहिम, कोरेगाव भीमाला भेट देणार

News Desk