HW Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज (११ जून) विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवा ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेन थांबल्याच्या माहिती मिळाली आहे. यामुळे ऑफिसला जाण्याच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण आणि डोंबिवली स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तर मुंबई काल (१० जून) मान्सूनपूर्व पावसाचे आगनमन झाल्यानंतर देखील मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

मध्य रेल्वेवर कोपर स्थानकाजवळ गाड्या खोळंबल्या आहेत, तर पश्चिम रेल्वेवर वांद्रे आणि अंधेरीजवळ तांत्रिक बिघाडामुळे लोकल ठप्प झाली आहे. कोपर स्थानकात कर्जतच्या दिशेने जाणार्‍या गाडीवर पेंटाग्राफचे स्पार्क उडाले. त्यामुळे अप आणि डाऊन वरील गाड्या ठप्प झाल्या आहेत.

 

Related posts

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

News Desk

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

News Desk

डॉ. मशहूर गुलाटी यांचा जागा घेणार राजू श्रीवास्तव

News Desk