HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, २० ते २५ मिनिटे लोकल ट्रेन उशिराने

मुंबई | कल्याण ते ठाकुर्लीदरम्यान दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

राजेंद्रनगर एलटीटी एक्स्प्रेसचे इंजिन ठाकुर्ली दरम्यान बंद पडले असून ब्रेक जॅम झाले आहेत. त्यामुळे जलद अपची वाहतूक धीम्या अपवर वळवण्यात आली आहे. १० वाजून ५० मिनिटाने ही घटना घडली असून या गाडी मागे दोन लोकल रखडल्या होत्या. त्यातील प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत ठाकुर्ली स्थानक गाठले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2014 पर्यंतच्या अनधिकृत झोपड्या अधिकृत करा!

News Desk

नक्षल समर्थकांच्या अटकेसंदर्भात महाराष्ट्र पोलिसांची पत्रकार परिषद

News Desk

विसर्जन मिरवणुकी दरम्यान एकाचा मृत्यू

Gauri Tilekar