HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक; मुंबई पालिकेची रणनिती ठरणार?

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आज (7 डिसेंबर) सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैठक बोलवण्यात आली आहे. लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्कांना घरे देण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत शिंदे-फडणवीस दोन्ही गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित असल्याने मुंबई महापालिकेची (BMC Election) चर्चा असल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे.

या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार आमित साठम, आमदार अतुल भातकळकर यांच्यासह भाजपचे बहुतांश आमदार उपस्थित आहे. तर शिंदे गटाचे आमदार देखील उपस्थित आहे. लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्कांना घरे देण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीबरोबरच आता सर्व आमदार एकत्रित असल्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बैठक सफाई कामगारांच्या घरासंदर्भात आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सगळे आमदार आणि खासदार उपस्थित आहेत.

ज्या ज्या भागात सफाई कामगारांना घरे नाहीत, ते देण्याची शिफारस लाड समितीने दिली होती. त्या अनुषंगाने ती बैठक बोलवली आहे. ही बैठक झाल्यानंतर छोटे खानी मुंबई पालिकेच्या दृष्टीने देखील चर्चा होऊ शकते. मुंबई पालिकेचे संपूर्ण प्रकरण हे न्यायालयात आहे. पालिकेच्या वॉर्ड पुर्नरचना हे न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेले आहे. या पार्श्वभूमीवर देखील चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Related posts

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक याचा सन्मान

swarit

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय

News Desk

शाळा आणि महाविद्यालयांसाठी तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम | गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

News Desk