HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

मुंबई | गेले 10 दिवस गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. तर काल (शुक्रवार, 09 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील प्रमुख चौपाटींवर भक्तांची असंख्य गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू होत्या. अशात चौपाटीवर निर्माल्य आणि इतर कचऱ्याचा प्रश्न दर वर्षी निर्माण होतो. त्यामुळे गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडा मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे 400 सभासद एनसीसीमधील 1500 मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते. गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला.

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेचे एन. बी. मोटे राज्य चिटणीस (अ.का.) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणमैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन स्काऊट्स आणि गाईड्स राज्य संस्थेच्या वतीने करण्यात येत असते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत असेल तर मध्यावधी निवडनुका घ्या- संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

News Desk

मंत्री संजय राठोडांवर कारवाई करा ! चित्रा वाघ यांचे पोलीस महासंचालकांना निवेदन

News Desk

क्रांती रेडकरांनी नवाब मलिकांविरोधात दाखल केला FIR

News Desk