HW News Marathi
मुंबई

चर्नी रोडचा पादचारी पुल दुरुस्तीसाठी २८ सप्टेंबरपासून बंद

मुंबई | पश्चिम रेल्वेतील चर्नी रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. २८ सप्टेंबर शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी उत्तर दिशेकडील पायऱ्यांचा वापर करावा अशी सूचना पश्चिम रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या पूल, रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि पादचारी पूल (एफओबी) यांची पाहणी नुकतीच करण्यात आलेली आहे.

दरम्यान या पाहणीनंतर पश्चिम रेल्वेला चर्नी रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चर्नी रोड स्थानकावरील या पुलाच्या दक्षिण दिशेला असलेल्या पायऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचा सल्ला विशेष पथकाने पश्चिम रेल्वेला दिला होता. यानुसार २८ सप्टेंबर, शुक्रवारपासून ते २६ नोव्हेंबर सोमवारपर्यंत म्हणजे एकूण ६० दिवसांत हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली आहे.

याआधी जुलै महिन्यात अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या दुर्घटनेत अनेक जण जखमीही झाले होते. यावेळी गोखले पूल दुर्घटनेच्या १६ तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली होती. अंधेरी येथे झालेल्या या दुर्घटनेनंतर रेल्वे आणि पालिकेने सर्व पुलांचे ऑडिट करायला सुरवात केली. त्यानंतर करीरोड, घाटकोपर, माटुंगा रोड आणि लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई विमानतळावर सहा तासाचा मेगाब्लॉक

swarit

पॅनकार्ड क्लब घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा ‘सेबी’ला दणका

News Desk

गांधीजींचे छायाचित्र हटवून सरकारने केला राष्ट्रपित्याचा अवमान

News Desk
राजकारण

मुदत संपत असून यापुढे प्लास्टिक वापरायला मुदतवाढ देणार नाही | रामदास कदम

News Desk

मुंबई | मुंबईमध्ये प्लास्टिक बंदीसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही मार्केटमध्ये भाजीवाले, फळवाल्यांकडे, किराणा दुकानात या पिशव्या सर्रास उपलब्ध होतात. तेल, दूध सुटे घेताना उपलब्ध होणाऱ्या पिशव्याही पातळ असतात. या पातळ पिशव्या रिसायकल होत नाहीत. त्यामुळे त्या गोळा केल्या जात नाहीत. त्यामुळे हा कचरा साठत जातो. मुंबईतील काही पर्यावरणप्रेमी, प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होणारी हानी जाणवून जागरुक झालेले नागरिक प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हे प्रमाण फार कमी आहे.

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून राज्यातील प्लास्टिकबंदीची मोहीम काटेकोरपणे राबवावी. तसेच पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापरासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

मंत्रालयात राज्यातील प्लास्टिकबंदी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह पर्यावरण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. राज्यात प्लास्टिकबंदी मोहीम सुरू असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैयक्तिक कारवाईची मोहीम सुरू करावी, असे निर्देशही कदम यांनी यावेळी दिले.

राज्य शासनाने प्रथम प्लास्टिक वापरास योग्य पर्याय द्यावा आणि त्यानंतरच बंदी घालावी, अशी मागणी करत व्यापारी संघटनांनी या बंदीला विरोध केला होता. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एक एप्रिलपासून राज्यात सर्वत्र प्लास्टिक तसेच प्लास्टिक पिशव्या वापरास बंदीचा आहे. पर्यावरणाला घातक ठरेल, अशा प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू वापरू नयेत यासाठी आम्ही आग्रही आहोत. परंतु, सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतांना सर्वाना विश्वासात घेणे आवश्यक होते. ही बंदी त्वरित लागू केल्यामुळे संभ्रमाचे वातावरण असून शासनाने तो दूर केलेला नाही. पर्याय दिला नसल्याने मालाची विक्री करणे अवघड झाले आहे. प्लास्टिक, थर्माकोलला पर्याय देऊन त्याची अंमलबजावणी गरजेची होती. ठोस पर्याय मिळेपर्यंत या निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती.

बंदीला आमचा विरोध नसून ती व्यावहारिक पध्दतीने, सर्वाना विश्वासात घेऊन अंमलात येण्याची गरज आहे. प्लास्टिक वस्तू निर्मिती करणाऱ्या उद्योजकांवर त्याचे गंभीर परिणाम होणार असून बेरोजगारी निर्माण होईल. हे लक्षात घेऊन तूर्तास प्लास्टिक बंदीला स्थगिती द्यावी आणि सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून योग्य तो पर्याय सुचवावा, असे ठरावही व्यापारी संघटनांच्या बैठकांमधून घेण्यात आले होते.

Related posts

भाजप-सेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा, कामाला लागा !

News Desk

योगी आदित्यनाथ यांची ओवेसींना धमकी ?

News Desk

ते म्हणतात २५ वर्षे युतीत सडली पण… !

News Desk