HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याने थकविले साडेसात लाखांचे पाण्याचे बिल

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बांगला मुंबई महानगरपालिकेच्या महापालिकेच्या डिफॉल्टर लिस्टमध्ये आला आहे. तब्बल ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाण्याचे बिल थकविल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून वर्षा बंगल्याचा समावेश डिफॉल्टर यादीत करण्यात आला आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या या डिफॉल्टर लिस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’सह अन्य मंत्र्यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे. या सर्वांची एकूण थकबाकीची रक्कम तब्बल ८ कोटी इतकी आहे. त्यात राज्याच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. असे असूनसुद्धा महानगरपालिकडून मात्र या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांना आणि नेतेमंडळींना असा वेगवेगळा न्याय का ? नेतेमंडळींना एवढी सूट का ? असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.

कोणत्या मंत्र्यांचे किती रुपयांचे बिल थकविले ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (वर्षा निवासस्थान)

थकबाकी – ७ लाख ४४ हजार, ९८१ रूपये

सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री (देवगिरी निवासस्थान)

थकबाकी – १ लाख ६१ हजार ५५ रुपये

विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री (सेवासदन निवासस्थान)

थकबाकी – १ लाख ६१ हजार, ७१९ रुपये

पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री (रॉयलस्टोन निवासस्थान)

थकबाकी – ३५ हजार ३३ रुपये

दिवाकर रावते, परिवहन मंत्री (मेघदूत निवासस्थान)

थकबाकी १ लाख ५ हजार ४८४ रुपये

सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन निवासस्थान)

थकबाकी २ लाख ४९ हजार २४३ रुपये

एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम (नंदनवन निवासस्थान)

थकबाकी २ लाख २८ हजार ४२४ रुपये

चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री (जेतवन निवासस्थान)

थकबाकी ६ लाख, १४ हजार ८५४ रुपये

महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री (मुक्तागिरी निवासस्थान)

थकबाकी १ लाख ७३ हजार ४९७ रुपये

ज्ञानेश्वरी निवासस्थान

थकबाकी ५९ हजार ७७८ रुपये

सह्याद्री अतिथीगृह

थकबाकी १२ लाख, ४ हजार ३९० रूपये

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यावरील कोरोनाचे, निराशेचे मळभ दूर करुन पोळा सण समृध्दी घेऊन येईल – अजित पवार

swarit

जे. जे. हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टरांना मारहाण

News Desk

अंधेरीमध्ये पेपर बॉक्स इंडस्ट्रीची भिंत कोसळली, १ जण जखमी

News Desk