HW News Marathi
मुंबई

जे. जे. हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टरांना मारहाण

मुंबई | डॉक्टरांवरील हल्ल्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना नातेवाईकांकड़ून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड देखील केली आहे. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ११ या सर्जरी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला.जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सातच्या सुमारास दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ ही सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५३ आणि ३३२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकेअर कायद्यासोबतच आरोपींवर तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना म्हणजेच मार्डकडून दुपारी निषेध करण्यात आला. मारहाणीत जखमी झालेल्या एका डॉक्टरवर उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळला, ५ जणांचा मृत्यू

News Desk

पहिल्याच पावसात रेल्वेचा बोजवारा

News Desk

गिरगावच्या कोठारी हाऊस इमारतीला आग

swarit