HW News Marathi
मुंबई

फेरीवाला हटाव मोहीमेवरून काँग्रेस मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

– दादर मध्ये तणावाचे वातावरण

– दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई – एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यां विरोधात मनसेने जोरदार मोहीम सुरू केली होती. त्यात अनेक फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोपही दिला होता. अधिकृत फेरीवाल्यांवर अन्याय नको ही काँग्रेसची भूमिका होती. शिवाय गरीब फेरीवाल्यांना मारहाण कशासाठी असा सवाल मुंबई काँग्रेसने केला होता. म्हणूनच मुंबई काँग्रेसने फेरीवाला सन्मान मोर्चाची हाक दिली होती. तो मोर्चा आज दादरमध्ये आयोजित करण्यात आला होता. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं हा मोर्चा काढला आहे. मात्र, या मोर्चामुळे दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकां समोर भिडले. फेरीवाल्यांच्या मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. यावेळी पोलिसांनी मनसे-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याचे कारण देत पोलिसांनी फेरीवाला सन्मान मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली होती. तरीही काँग्रेसनं हा मोर्चा काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता

News Desk

शौचालयासाठी कंत्राटदारांना मुदतवाढ, दोन वर्षांत दोन हजार शौचालये बांधली जाणार ?

News Desk

फोर्टमधील पटेल चेंबर्स इमारतीला भीषण आग

News Desk
मुंबई

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk

– मुंबईतल्या तीन रेल्वे स्थानकांत उभारणार पादचारी पुल

मुंबई – एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. म्हणून त्यांनी तीन स्थानकांवर तीन नवे पूल तातडीने उभारण्याचा निर्णय़ घेतला आहे. विशेष म्हणजे हे पुल बांधण्याचे काम आपल्या पराक्रमाने जगामध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय लष्कराला देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा अर्थ पूल बांधण्यासाठी रेल्वे प्रशासन नक्कीच सक्षम नाही. ते हतबल आहेत अशी चर्चा सुरू आहे. या बाबत रेल्वे मंत्र्यांना विचारलं असता हे पुल तातडीने पूर्ण व्हावेत त्याचे काम युद्ध पातळीवर व्हावे म्हणून लष्कराला पाचारण करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली या तीन स्थानकांवर नवे पादचारी पूल उभे करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या तीनही पुलांचं काम ३१ जानेवारी २०१८ च्या आत करण्याचं उद्दीष्ठ लष्करानं ठेवलं आहे. दरम्यान एल्फिन्स्टन येथील पादचारी पूल बांधण्याचं काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पुलासाठी आवश्यक सामुग्री तयार केल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या पुलाची पायाभरणी केली जाईल. पुढच्या १५ दिवसांत – म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत हा पूल बांधून तयार होईल आणि ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित सर्व छोटी-मोठी कामं संपवून तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

Related posts

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

Aprna

मुंबईतील पवई परिसरातील इमारतीला लागलेली आग आटोक्यात

News Desk

नीरव मोदीची प्रतिकृती बनवत मुंबईतील बीडीडी चाळीत सर्वात मोठी होळी

News Desk