HW Marathi
मुंबई राजकारण

महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा !

मुंबई | “मुंबई महानगरपालिकेच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे बुधवारी (१० जुलै) रात्री गोरेगाव पूर्व येथे अडीच वर्षाचा दिव्यांश सिंह मॅनहोलमध्ये पडला. या निष्काळजी मुंबई महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली आहे. “दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत महापौरांना या घटनेबाबत माहिती नव्हती. हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे”, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

“बुधवारी रात्री १० वाजता मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आंबेडकर नगर येथे दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षाचा मुलगा मॅनहोलमध्ये पडला या घटनेला १२ तास होऊन गेले आहेत. तरीसुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अग्निशमन दलाला त्या मुलाचा शोध घेता आलेला नाही. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आज (११ जुलै) सकाळी ८ वाजेपर्यंत या दुर्घटनेबद्दल काहीही माहीत नव्हते. हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे”, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी दिली आहे.

“मुंबई महापालिका जी आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिकाआहे, जिचे बजेट ३१ हजार कोटी रुपये आहे, ही महापालिका चालवणारे शिवसेना-भाजप सरकार दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दावा करते की, मनपा पावसाळ्याला तोंड देण्यासाठी तयार आहे, नाल्यांची साफसफाई झालेली आहे, खड्डे भरण्यात आलेले आहेत, मॅनहोल उघडे नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे दावे दरवर्षी पूर्णपणे फोल ठरतात. महापालिकेचे आणि जनतेचे करोडो रुपये याच नाल्यांमध्ये वाहून जातात”, असे आरोपही मुंबई काँग्रेसकडून करण्यात आले आहेत.

Related posts

…नाहीतर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही !

News Desk

‘जय राजस्थान’ चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्मरणशक्तीचे पुस्तके पाठवणार

News Desk

Dahi Handi |उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांवर घातले निर्बंध,बाल गोविंदांचा समावेश असल्यास होणार कारवाई

News Desk